Wankhede Stadium pays tribute to Rohit Sharma with dedicated stand : मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आता भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचं स्टँड दिसणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला आणि त्यानंतर यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. महेंद्रसिंग धोनीनंतर या दोन्ही स्पर्धेची जेतेपदं नावावर असलेला तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात रोहितच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.