ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत तीन वन डे सामने खेळणार असून पहिला सामना १९ ऑक्टोबरला पर्थमध्ये होईल.
रोहित शर्मा व विराट कोहली यांचे पुनरागमन होणार असून दोघे वन डे वर्ल्ड कप २०२७ खेळण्याच्या तयारीत आहेत.
शुभमन गिलला विश्रांती मिळण्याची शक्यता असून त्याच्या जागी यशस्वी जैस्वाल सलामीला खेळू शकतो.
Team India squad changes before Australia ODI series : रोहित शर्मा शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वन डे मालिका खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. भारतीय संघ तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि त्याचा पहिला सामना १९ ऑक्टोबरला पर्थवर होईल. त्यानंतर दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे २३ व २५ ऑक्टोबरला सिडनी येथे खेळवला जाईल.