
T20 World Celebration Planning Told By Rohit Sharma : मुंबईच्या वानखडे स्टेडियमचा काल ५० वा सुवर्ण मोहोत्सव साजरा झाला. या कार्यक्रमला मुंबई क्रिकेट असोसिएशनमधून खेळलेल्या व भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या क्रिकेटपटूंनी उपस्थिती लावली होती. भारताचे आजी-माजी ७ कर्णधार या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सचिन तेंडूलकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसनकर, रवी शास्त्री, डायना एडुल्जी, अजिंक्य रहाणे यांचा समावेश होता. या कार्यक्रमामध्ये या दिग्गजांची मुखाखत झाली. ज्यामध्ये बोलताना रोहित शर्माने मुंबईमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सिलेब्रेशनबद्दलचा किस्सा सांगितला.