Rohit Sharma during India's England tour,
esakal
BCCI selection committee on Rohit Sharma future: १९ वर्ष भारतीय संघाची सेवा करणारा रोहित शर्मा येत्या रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याची शक्यता बळावली आहे. ३९ वर्षीय रोहितचा २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड समिती विचार करत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रोहितशिवाय पुढे जाण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे आणि त्यामुळेच लॉर्ड्सवर होणारा IND vs ENG तिसरा वन डे सामना हा रोहितचा शेवटचा ठरू शकतो. या संदर्भात जेव्हा निवड समितीने रोहितशी संवाद साधला, त्यानंतर हिटमॅनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) वरिष्ठ अधिकाऱ्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण...