Rohit Sharma and Virat Kohli during an ODI match as India gear up to host Afghanistan in June 2026.
esakal
India vs Afghanistan Test and ODI series venues and dates: न्यूझीलंडविरुद्ध जानेवारीत पार पडलेल्या वन डे मालिकेनंतर रोहित शर्मा व विराट कोहली, ही अनुभवी जोडी पुन्हा कधी निळ्या जर्सीत दिसेल, याची उत्सुकता होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आज त्याबाबतची मोठी घोषणा केली आणि रोहित व विराटच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ नंतर भारतीय संघ एक कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित व विराट पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. बीसीसीआयने अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.