Rohit Sharma retirement reason after BCCI rejection : रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली, या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक मुद्दे समोर येत आहेत. भारताचा माजी कर्णधार रोहितने ७ मे २०२५ ला सोशल मीडियावर पोस्ट लिहून कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्याआधी काही दिवसांपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माायकेल क्लार्क याच्या पॉडकास्टवर इंग्लंड दौरा खेळण्यास उत्सुक असल्याचे मत व्यक्त केले होते. मग अचानक काय झालं? रोहितने हा निर्णय स्वतःहून घेतला की त्याला घेण्यास भाग पाडले गेले?