
Mumbai vs Meghalaya Ranji Trophy 2025 : मुंबई संघात स्टार खेळाडूंचा भरणा असताना घरच्या मैदानावर त्यांना जम्मू-काश्मीरविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुढील होणाऱ्या सामन्यामधून तीन भारतीय खेळाडूंनी माघार घेतली आहे. ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील मेघालयाविरूद्धच्या सामन्यासाठी सलामीवीर रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल व श्रेयस अय्यर उपलब्ध राहाणार नसल्याचे समजत आहे.