Gautam Gambhir influence on Ajit Agarkar Rohit Sharma decision
esakal
BCCI selection committee decision on Rohit Sharma explained: रोहित शर्माला २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचा होता, मग त्याच्याकडून कर्णधारपद का काढून घेतलं गेलं? हा सवाल विचारला जातोय. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यानंतर पुढील मालिकेसाठी संघाचा कर्णधारच बदलण्यात आला. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड समिती व संघ व्यवस्थापनाला नव्याने सुरुवात करायची होती. पण, रोहितकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय कठोर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
रोहितला कर्णधारपदावरून मुक्त करण्याचा निर्णय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर ( Ajit Agarkar) याने जाहीर केला असला तरी त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारा कोणी दुसराच असल्याचा दावा भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारी ( Manoj Tiwari) याने केला. त्याचा रोख मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याच्याकडे होता.