रोहित शर्माच्या वन डे निवृत्तीनंतर श्रेयस अय्यरला नवा कर्णधार करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.
सूर्यकुमार यादवनंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय तीन फॉरमॅटसाठी दोन कर्णधार ठेवण्याची नवी रणनीती आखत आहे.
Shreyas Iyer in focus as BCCI considers him for ODI captaincy : सातत्यपूर्ण कामगिरी करूनही श्रेयस अय्यरला आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात न निवडल्याने जोरदार टीका होत आहे. श्रेयस क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करतोय, परंतु त्याला अपेक्षित संधी मिळत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पण, बीसीसीआयच्या डोक्यात काही वेगळा प्लॅन आहे आणि ते श्रेयसच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोठा गेम करण्याच्या प्रयत्नात आहेत.