Rohit Sharma's 'surprise' retirement email भारतीय क्रिकेटमध्ये काल अनपेक्षित काहीतरी घडलं.. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ सुरू असताना हिटमॅन रोहित शर्माने सायंकाळी ७.२९ वाजता इंस्टाग्राम पोस्ट केली अन् आजपासून आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील सिडनी कसोटीत प्लेइंग इलेव्हनमधून स्वतःला बाहेर बसवल्यानंतर, 'मी कुठे जात नाही. या निर्णयाला तुम्ही निवृत्ती समजू नका.' असे म्हणाला होता. पण, पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहितने अचानक निवृत्ती जाहीर केली. BCCI साठी हा बॉम्बच होता...