Rohit Sharma and Virat Kohli Buzz Could Revive India’s ODI Magic in New Zealand
esakal
NZC special proposal to BCCI for India tour : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी त्यांची हवा अजूनही आहे. हे दोन महान खेळाडू भारताला २०२७ चा वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांनी अद्यापही वन डे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळेच चाहतेही त्यांचा खेळ याची देही, याची डोळा पाहण्याची संधी गमावू इच्छित नाही. रोहित व विराट यांच्यामुळे भारताच्या वन डे सामन्यांना प्रचंड मागणी आहे आणि त्यामुळेच न्यूझीलंड क्रिकेटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( BCCI ) एक मागणी केली आहे.