आरसीबीने आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकून बंगळुरूत विजयी मिरवणूक काढली.
मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू व ५० हून अधिक जखमी झाले.
घटनेनंतर आरसीबीवर टीकेची झोड उठली आणि त्यांना जबाबदार धरले गेले.
RCB emotional tribute letter to 12th Man Army : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चं विजेतेपद मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या चाहत्यांसाठई बंगळुरूत विजयी मिरवणूक आयोजित केली होती. मात्र, या मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आणि यात ११ जणांचा मृत्यू तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेकांनी आरसीबीच्या संघाला यासाठी जबाबदार धरलं होतं. चहुबाजुंनी त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आरसीबीने या घटनेतील मृतांच्या कुटंबियांना आर्थिक मदतीचीही घोषणा केली होती. आज जवळपास ८४ दिवसानंतर RCB सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत.