RP Singh: सिराजच्याही कार्यभाराचे नियोजन करा; माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग यांचा सल्ला, दुखापतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना
Mohammed Siraj: माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग यांनी मोहम्मद सिराजच्या कार्यभाराचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे, त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराच्या कार्यभाराचे नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले. सिराजला दुखापतीपासून बचावण्यासाठी कार्यभाराचे संतुलन महत्त्वाचे आहे.
नवी दिल्ली : मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराएवढाच महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. दुखापतमुक्त ठेवण्यासाठी त्याच्यावरील कार्यभाराचेही व्यवस्थित नियोजन करायला हवे, असे मत भारताचे माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग यांनी व्यक्त केले आहे.