

15-Year-Old Fanny Utagushimaninde Creates History With Record T20I Century.j
esakal
Fanny Utagushimaninde youngest T20I century record: पुरुषांच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सध्या वैभव सूर्यवंशी हा १४ वर्षांचा पोरगा मैदान गाजवत असताना महिला क्रिकेटमध्ये १५ वर्षीय फॅनी उटागुशीमानिंदे हीने विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. रवांडाच्या या फलंदाजने महिलांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा मान पटकावला आहे. १५ वर्षांच्या फॅनीने नायजेरिया निमंत्रित ट्वेंटी-२० स्पर्धेत घाना संघाविरुद्ध हा वर्ल्ड रेकॉर्ड केला.