SA20: रोहित शर्माच्या 'भीडू' चे खणखणीत शतक; १६ चेंडूंत ८६ धावांचं वादळ, तरीही मुंबई इंडियन्सच्या संघाची थोडक्यात हार

MI Cape Town vs DSG SA20 match result: SA20 लीगच्या पहिल्याच सामन्यात थरारक स्पर्धा पाहायला मिळली. डरबन सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ बाद २३२ धावांचा डोंगर उभारला आणि सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतरही मुंबई इंडियन्स केपटाउनने जबरदस्त लढत देत सामना अखेरपर्यंत जिवंत ठेवला होता.
Durban’s Super Giants defeated MI Cape Town by 15 runs despite Ryan Rickelton’s stunning 113 in a high-scoring SA20 thriller

Durban’s Super Giants defeated MI Cape Town by 15 runs despite Ryan Rickelton’s stunning 113 in a high-scoring SA20 thriller

esakal

Updated on

232 vs 217! DSG Edge Past MI Cape Town in SA20: दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगची सुरुवात एकदम दणक्यात झाली. चौथ्या पर्वाच्या पहिल्याच सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. एडन मार्करमच्या डरबन सुपर जायंट्सने २३२ धावांचा डोंगर उभा करून मुंबई इंडियन्स केपटाउनला आव्हान दिले. पण, MI Cape Town च्या संघानेही लढाऊ बाणा दाखवला आणि २१७ धावांपर्यंत मजल मारली. आयपीएलमध्ये रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) Mumbai Indians साठी सलामीला येणाऱ्या रायन रिकेल्टनने हा सामना गाजवला. Ryan Rickelton ने SA20 च्या या पर्वात पहिला शतकवीर होण्याचा मान पटकावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com