

SA vs PAK 2nd Test : पाकिस्तान संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यातील पहिल्याच डावात आफ्रिकन फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. यामध्ये पहिल्यांदाच सलामीसाठी उतरलेल्या रायन रिकेल्टनने द्वीशतकी खेळी केली, त्याचबरोबर कर्णधार टेम्बा बावूमा व कायल वेरेन यांनी शतकी खेळी केली. यांच्या खेळीमुळे दुसऱ्या दिवसापर्यंत आफ्रिकेने ७ विकेट्स गामावत धावांचा डोंगर उभा केला आहे. आफ्रिकेने ५५० धावांचा टप्पा पार केला आहे.