
SA vs PAK T20 Match : नव्या दमाच्या खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या आफ्रिका संघाने पाकिस्तानाल लोळवले. पाकिस्तानविरूद्धचा पहिला ट्वेंटी-२० सामना दक्षिण आफ्रिकेने ११ धावांनी जिंकला. नवख्या खेळाडूंना फार यश मिळाले नाही. पण अनुभवी डेव्हिड मिलरने तुफानी खेळी केली. त्यात जॉर्ज लिंडेने धावांची भर टाकली आणि आफ्रिकेने १८३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात कर्णधार मोहम्मद रिझवाने युवा साईम आयुबला साथीला घेत फटकेबीजी करत आफ्रिकेला टक्कर दिली. पण जॉर्ज लिंडेच्या अष्टपैलू कामगिरीने आफ्रिकेच्या पारड्यात विजय खेचून आणला.