
James Neesham Dropped Catch of Joe Root Video Viral : सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये (SA20) हर्शल गिब्सच्या १९९९ वर्ल्ड कपमधील चुकीची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. काल झालेल्या प्रिटोरिया कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात पार्ल रॉयल्सने विजय मिळवत SA20 च्या यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. सामन्यात जेम्स निशमने मोठी चूक केली. जो रूटचा पकडलेला झेल सेलिब्रेशच्या नादात सुटला आणि चौकर गेला. पुढे जो रूट सामन्यातील सर्वात मोठी खेळी करत संघाला प्ले ऑफमध्ये घेऊन गेला.