SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Sachin Tendulkar Helps Ramabai: मुलींच्या शिक्षणासाठी अंबाजोगाई येथे अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांची जिद्द सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत पोहोचली. रमाबाईची गोष्ट समजल्यानंतर सचिन यांनी त्यांच्यासाठी रनिंग शूज पाठवले.
SACHIN TENDULKAR

SACHIN TENDULKAR

esakal

Updated on

Sachin Tendulkar Helps Ramabai: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई नको ते प्रयत्न करू शकते आणि काही दिवसांपूर्वी अशीच एक बातमी समोर आली होती.

ती म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील  रमाबाई रणवीर यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘अमृत दौड’ मॅरेथॉन स्पर्धेत एका ४७ वर्षीय आईने कौतुकास्पद कामगिरी केली होती.  रमाबाई या मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावत ३ हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं होतं. त्यांची ही जिद्द आता क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com