Sachin Tendulkar Uninterested in BCCI President Post
esakal
बीसीसीआय अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरचे नाव चर्चेत असले तरी त्याने स्वतः या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले.
‘सकाळ’ने काही दिवसांपूर्वीच सचिन अशा कोणत्याही पदासाठी उत्सुक नसल्याचे वृत्त दिले होते.
बीसीसीआयची ९४वी वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबरला मुंबईत होणार असून त्यात अध्यक्ष व आयपीएल अध्यक्ष निवडले जातील.
Sachin Tendulkar denies rumours of becoming BCCI President : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मोठा क्रिकेटपटू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे नाव या शर्यतीत आघाडीवर आहे आणि त्याची वारंवार चर्चाही सुरू आहे. पण, काही दिवासांपूर्वी सचिन तेंडुलकर अशा कोणत्याही पदासाठी उत्सुक नसल्याचे ‘सकाळ’ला खात्रीलायकरीत्या समजले होते आणि त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.