Sachin Tendulkar’s explosive 64-run knock in IML 2025 : बुधवारी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया मास्टर्सच्या शेन वॉटसन आणि बेन डंक यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे इंडिया मास्टर्सला पराभव पत्करावा लागला. पण, या सामन्यात सचिन तेंडुलकरने मैदान गाजवले... ९०च्या दशकातील क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टर्सचा क्लास पाहायला मिळाला. त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह, पुल शॉट, गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला षटकार.. हे सर्व डोळ्यांत साठवून ठेवणारे होते. ५१व्या वर्षीही सचिनची ही खेळी अविश्वसनीय होती.