

Who Is Salil Ankola
esakal
SALIL ANKOLA CRICKET CAREER: प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं ते भारतीय संघाकडून खेळण्याचं. अनेक खेळाडूंचं हे स्वप्न पूर्ण होतं, पण काहींना दुखापतींमुळे लवकरच क्रिकेटपासून दूर व्हावं लागतं. अशीच एक गोष्ट आहे सचिन तेंडुलकरसोबत भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूची.
या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एक कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळले. त्यानंतर वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी केली होती.