
Australia vs India Test Cricket: ऑस्ट्रेलियाने नुकतेच भारताला कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने पराभूत केले. दरम्यान, ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जेव्हाही आमने-सामने असतात, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये स्लेजिंग पाहायला मिळणे नवीन नाही. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ दरम्यानही या गोष्टी अनुभवायला मिळाल्या.
यादरम्यानही मेलबर्नला झालेल्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय सलामीवीर सॅम कॉन्स्टास आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती. याबाबत बरीच चर्चाही झाली.