
Australia vs India 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली आहे. हा सामना कसोटी मालिकेतील चौथा सामना असून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे. या सामन्याची सुरुवात नाट्यपूर्ण झाली. त्यातही सुरुवातीला १९ वर्षीय सॅम कोन्स्टासने सर्वांचे लक्ष वेधले.
या सामन्यात कोन्स्टासला नॅथन मॅकस्विनीच्या जागेवर पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याने उस्मान ख्वाजासोबत सलामीला फलंदाजी केली. कोन्स्टासने सुरुवातीला थोडा अंदाज घेत फलंदाजी केली.