Sanju Samson, दिलदार माणूस! मोहम्मद अझरुद्दीनसाठी सलामीची जागा सोडली... पठ्ठ्याने वादळी शतक झळकावले, संघाला सर्वोच्च धावसंख्येपर्यंत पोहोचवले

Sanju Samson's heartwarming gesture for Mohammed Azharuddeen: संजू सॅमसनच्या दिलदारपणाची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ मध्ये केरळ आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात संजूने सहकारी मोहम्मद अझरुद्दीनसाठी सलामीची जागा सोडली. एवढेच नाही, तर त्याने स्वतःची बॅटही अझरुद्दीनला दिली.
Mohammed Azharuddeen | SMAT 2026

Sanju Samson Gives Up Opening Slot to Mohammed Azharuddeen, Who Smashes a Century Kerala Create History in SMAT 2026

esakal

Updated on: 

Mohammed Azharuddeen scores century with Sanju Samson's bat : केरळ संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत गुरुवारी हिमाचल प्रदेशवर ६७ धावांनी विजय मिळवला. केरळचा मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा एकदा वादळी खेळून चमकला.. भारताच्या ट्वेंटी-२० संघातील सलामीवीर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केरळ संघाने या सामन्यात स्पर्धा इतिहासातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. संजूने या सामन्यात त्याच्या सलामीची जागा मोहम्मद अझरुद्दीनसाठी सोडली. मोहम्मद अझरुद्दीन यानेही मिळालेल्या संधीचं सोनं करताना खणखणीत शतक झळकावले आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. शतक झळकावल्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशनही चर्चेत आले.

Loading content, please wait...