

India vs Ireland Playing XI
esakal
India vs Ireland Playing XI: भारतीय संघ आता आगामी आयर्लंड(Ireland) दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना शुक्रवारी म्हणजेच २६ जून रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळणार आहे. हा सामना अनेक कारणांमुळे महत्त्वाचा ठरणार आहे.
कारण या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे(Shreyas Iyer) सोपवण्यात आली आहे, तर युवा तिलक वर्माची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीलाही या दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.