T20 World Cup: १० वर्ष तू स्वतःला कुठे पाहतोस? वडिलाचं स्वप्न सॅमसनने पूर्ण केलं... म्हणाला, 'टीम इंडियाचा बेस्ट खेळाडू...'

Sanju Samson Fulfills His Father’s Dream: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत विजेतेपद मिळवले. संजू सॅमसनच्या मालिकावीर ठरला. त्यामुळे मालिकावीर पुरस्कार जिंकत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
Sanju Samson | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sanju Samson | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

Sanju Samson Fulfills His Father’s Dream: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत जिंकली. यासोबतच मायदेशात टी२० वर्ल्ड कप जिंकण्याचा आणि तीन वेळा टी२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रमही केला. हा वर्ल्ड कप जसा भारतीय संघाच्या यशासाठी लक्षात राहिल, तसाच तो संजू सॅमसनच्या पुनरागमनासाठीही लक्षात राहिल.

टी२० वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनमधील सॅमसनच्या (Sanju Samson) जागेवरही प्रश्नचिन्ह होते. मात्र भारताची वरची फळी अपयशी ठरल्यानंतर अखेर सॅमसनला संधी मिळाली आणि त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी झेलत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठ्या खेळी केल्या.

त्याने या वर्ल्ड कपमध्ये गेल्या तीन सामन्यात नाबाद ९७, ८९ आणि ८९ अशा धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही जिंकला. त्यामुळे त्याने त्याच्या वडिलांचं स्वप्नही पूर्ण केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com