
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची धामधूम सुरू असातना क्रिकेट चाहत्यांना आणि विशेषतः सचिन तेंडुलकच्या फॅन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. सचिनची लेक सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar) ही ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) च्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या हंगामासाठी मुंबई फ्रँचायझीची मालक म्हणून सामील झाली आहे. जेटसिंथेसिस, डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी, यांनी ही घोषणा केली आहे.