बुची बाबू स्पर्धेत मुंबईच्या सर्फराज खानने TNCA XI विरुद्ध ९२ चेंडूत शानदार शतक झळकावले.
त्याने १० चौकार आणि ६ षटकारांसह ११४ चेंडूंत १३८ धावा केल्या.
सुवेद पारकरने ७२ धावांची खेळी तर आकाश पारकर १६ धावांवर खेळत होता.
Buchi Babu Trophy 2025 Mumbai vs TNCA XI match highlights : भारतीय कसोटी संघाबाहेर असलेल्या सर्फराज खानने ( Sarfaraz Khan) सोमवारी (१८ ऑगस्ट) बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हन विरुद्ध मुंबईकडून शानदार शतक झळकावले. सर्फराजने ११४ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांसह १३८ धावांची खेळी केली. त्याने ९२ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या.