6,4,6,4,6,4... सर्फराज खानच्या ३१० च्या स्ट्राईक रेटने धावा, झळकावले वेगवान अर्धशतक; श्रेयस अय्यरचीही दमदार खेळी, मुंबईची एका धावेने हार

Sarfaraz Khan fastest fifty in Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्फराज खानने इतिहास रचत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात सर्फराजने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला.
Sarfaraz Khan created history in the Vijay Hazare Trophy by smashing the fastest fifty

Sarfaraz Khan created history in the Vijay Hazare Trophy by smashing the fastest fifty

Updated on

Mumbai vs Punjab Vijay Hazare Trophy highlights : मुंबईला विजय हजारे ट्रॉफीत पंजाबविरुद्ध १ धावेना हार पत्करावी लागली. तिलक वर्मा जखमी झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर दावा करण्यासाठी आता शर्यत रंगताना दिसतेय.. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने सातत्य राखताना शतक झळकावले, तर मुंबईच्या सर्फराज खानने ( Sarfaraz Khan ) वेगवान अर्धशतक झळकावून निवड समितीचे लक्ष वेधले आहे. त्याने १५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हे विजय हजारे ट्रॉफीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. त्याच्यासोबतीला कर्णधार श्रेयस अय्यरही उभा राहिला आणि त्यानेही जोरदार फटकेबाजी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com