India A vs England Lions: Sarfaraz Khan and Karun Nair Prove a Point on Day 1 : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी टीम इंडियाच्या प्रमुख संघात निवडलेल्या काही खेळाडूंना भारत अ संघासोबत पाठवले आहे. त्यामुळे या सराव सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर त्यांची पोकळी भरून काढण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत नवा प्रवास सुरू करतोय आणि त्यासाठी सराव सामन्यातील खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची आहे.