India A vs Eng Lions, 1st unofficial Test : इंग्लंड लायन्स संघाने पहिल्या कसोटी सामन्यात भारत अ संघाविरुद्ध आघाडी घेतली आहे. भारत अ संघाचा ५५७ धावांचा टप्पा इंग्लंड लायन्सने ओलांडला आहे आणि चौथ्या दिवशी आघाडी घेतली आहे. या कसोटीचा निकाल अनिर्णीत राहणार असला तरी करुण नायर, सर्फराज खान, ध्रुव जुरेल यांनी फलंदाजीत आपली छाप पाडली. सर्फराज खानने क्षेत्ररक्षणातही दम दाखवताना एक अफलातून झेल टिपला. इंग्लंड दौऱ्यासाठीच्या कसोटी मालिकेत संघात निवड व्हावी यासाठी सर्फराजने १० किलो वजन कमी केले होते. तरीही त्याला डावलले गेले, परंतु त्याच्या फिटनेसची साक्ष देणारा झेल त्याने टिपून निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले आहे.