
- श्रीकृष्ण उबाळे
बीडच्या सौरभ शिवाजी नवले (वय २६) या क्रिकेटपटूने रविवारी (ता. २५) नाशिक येथे झालेल्या रणजी क्रिकेट सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. महाराष्ट्र क्रिकेट संघाला विजय मिळवून देण्यामध्ये त्याने सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे बीडच्या सौरभने महाराष्ट्र क्रिकेट संघाचा गौरव वाढविला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.