Sayali Wani defeats Manika Batra in Golden Point
esakal
अल्टिमेट टेबल टेनिस ( UTT) मध्ये भारतीय युवा खेळाडू सायली वाणीने एका अत्यंत नाट्यमय सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली. तिने सलग तीन 'टाय पॉइंट्स'वाचवले आणि त्यानंतर 'गोल्डन पॉइंट'वर भारताची दिग्गज खेळाडू मनिका बत्राचा पराभव करून यूपी प्रोमिथियन्ससाठी सीझन ७ मधील पहिला विजय निश्चित केला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत यूपीने अहमदाबाद एपीएल पायपर्सवर ८-७ ने विजय मिळवला.