Gautam Gambhir’s statement on Rohit Sharma proves true
“सर्वांना माझा नमस्कार, मी हे सांगू इच्छितो की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगाच्या जर्सीत माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वन डे फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन," रोहित शर्मा ( Rohit Sharma Retire ) इंस्टाग्रामवर ही पोस्ट लिहिली अन् सर्वांना धक्काच बसला. पण, क्रिकेट जाणकारांसाठी हे धक्कादायक अजिबात नव्हतं, कारण रोहितचं वय अन् त्याचा हरवलेला फॉर्म... हे त्याला निवृत्ती घ्यायला भाग पाडतील हे सर्वांना माहीत होतं. ते आज घडलं, पण हे सहजासहजी घडलेलं नाही.