
Shafali Verma smash 22 fours and 11 sixes: भारतीय महिला संघाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेंटी-२० व वन डे मालिका गाजवली. पण, या संघात सलामीवीर शफाली वर्माला स्थान मिळाले नव्हते. भारताच्या या स्फोटक खेळाडूने मग बीसीसीआयच्या SENIOR WOMENS ONE DAY TROPHY स्पर्धेत आपला खेळ दाखवला. हरियाना संघाचे नेतृत्व करताना शफालीने सोमवारी बंगालविरुद्ध वादळी खेळी केली. तिचे द्विशतक ३ धावांनी हुकले.