India Women qualification chances after beating Bangladesh
esakal
India Women qualification chances after beating Bangladesh: भारतीय महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी बांगलादेशवर महत्त्वपूर्ण विजय मिळवला. भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा बांगलादेशने चांगला फायदा उचलला, परंतु राधा यादव व श्री चरणी यांच्या माऱ्याने भारताला पुनरागमन करून दिले. त्यानंतर शफाली वर्माच्या ( Shafali Verma ) आक्रमक फटकेबाजीने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. ती बाद होताच बांगलादेशने कमबॅक केले खरे, परंतु ते हरमनप्रीत कौरच्या संघाला पराभूत करू शकले नाही. भारताने हा विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत...