Shahbaz Nadeem Latest News Marathi
Shahbaz Nadeem Latest News Marathisakal

Shahbaz Nadeem News : शेवटच्या कसोटीआधी 500 विकेट घेणाऱ्या टीम इंडियाच्या स्पिनरने अचानक घेतली निवृत्ती!

Shahbaz Nadeem Latest News : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या एका खेळाडूने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे.

Shahbaz Nadeem Announces Retirement : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. दरम्यान, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक विकेट घेणाऱ्या अनुभवी डावखुरा गोलंदाज शाहबाज नदीमने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द काही खास नव्हती. त्याने केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली होती. बऱ्याच दिवसांपासून त्याला भारतीय संघात पुनरागमनाची आशा होती, मात्र संधी न मिळाल्याने त्याने अखेर हा निर्णय घेतला.

Shahbaz Nadeem Latest News Marathi
IND vs ENG 5th Test Pitch Report : राहुल-रोहित इंग्रजांना देणार सरप्राईज; धरमशालेची खेळपट्टी आपला गुणधर्मच सोडणार?

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात शाहबाज नदीम अनसोल्ड राहिला. कोणत्याही संघाने त्याला आपल्या संघात घेण्यास रस दाखवला नाही. इतर लीगमध्ये सहभागी होत राहणार असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले. म्हणजेच तो परदेशी टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्यावर भर देत आहे. दुसरीकडे, रणजी ट्रॉफीमध्ये त्याने शेवटचा लाल चेंडूचा सामना राजस्थानविरुद्ध खेळला. यानंतर तो आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळताना दिसणार नाही.

Shahbaz Nadeem Latest News Marathi
IND vs PAK मॅचची तिकिटे करोडोमध्ये पण तुम्ही घ्या T20 World Cup चा 'फ्री'मध्ये आनंद, अट फक्त एकच

कशी होती शाहबाज नदीमची कारकीर्द?

जर आपण शाहबाज नदीमच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्याने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले. या सामन्यानंतर त्याला 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. या दोन सामन्यांनंतर त्याला एकदाही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी कामगिरी केली नाही. आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला फक्त 8 विकेट घेता आल्या. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी उत्कृष्ट आहे. त्याने 140 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 542 विकेट्स आणि 134 लिस्ट ए सामन्यांमध्ये 175 बळी घेतले. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला. जिथे त्याने 72 सामन्यात 48 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com