
Shaheen shah Afridi Unwanted Record: पाकिस्तानने न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा ट्वेंटी-२० सामनाही गमावला. शेजाऱ्यांनी प्रथम फलंदाजी करताना दिलेले १३६ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने अवघ्या ७९ चेंडूत पूर्ण केले आणि मालिकेतील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला. १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. ज्यामध्ये टीम सिफर्टनं शाहीन शाह आफ्रिदीला तुफान धुतले. त्याने शाहीनला एका षटकात २६ धावा कुटल्या आणि शाहीनच्या नावावर एक अनोखा विक्रम बनल.