Shahid Afridi on Babar Azam
Shahid Afridi on Babar Azamsakal

Shahid Afridi : "बाबर आझमला जितक्या संधी मिळाल्या की..." आफ्रिदीच्या वक्तव्याने पाकिस्तानी क्रिकेटमध्ये उडाली खळबळ

Shahid Afridi on Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांना वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीमधून बडतर्फ केले आहे.
Published on

Shahid Afridi on Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांना वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीमधून बडतर्फ केले आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

Shahid Afridi on Babar Azam
Gautam Gambhir: 'मी आधीच्या सपोर्ट स्टाफचे...', भारतीय संघाचा हेड कोच झाल्यानंतर गंभीर द्रविडबद्दल काय म्हणाला?

शाहिद आफ्रिदी सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियन्स लीग खेळत आहे. त्यांनी एका पाकिस्तानी पत्रकाराला मुलाखत दिली. त्यादरम्यान आफ्रिदीने बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले.

तो म्हणाला की, यापूर्वी अनेक खेळाडू कर्णधार झाले आहेत, मात्र बाबरसारखी संधी कोणालाही मिळाली नाही. त्याला अनेक स्पर्धांमध्ये संधी मिळाली, पण तो फ्लॉप ठरला. आता नवा चेहरा आणून त्याला संधी देण्याची गरज आहे.

Shahid Afridi on Babar Azam
Sunil Gavaskar Birthday: 76 वर्षाचा तरूण... 'हा' कॅच पाहून काही तरूणांनाही लाज वाटेल, वाढदिवसाच्या शुभेच्छा गावसकर सर

त्याचवेळी शाहिद आफ्रिदीनेही वहाब आणि रज्जाक यांना पीसीबीच्या निवड समितीमधून काढून टाकल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला, "मला नुकतेच कळले की वहाब आणि रज्जाक यांना पीसीबीच्या निवड समितीतून काढून टाकण्यात आले आहे. पण मला हे समजले नाही कारण 6-7 लोकांच्या टीममधून फक्त 2 लोकांना काढून टाकण्यात आले आहे.

रज्जाकचा काही आठवड्यांपूर्वीच पुरुष आणि महिला दोन्ही संघांच्या निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता तो कोणत्याही संघासाठी काम करणार नाही. याबाबत आफ्रिदी म्हणाला की, ज्याची निवड होईल त्याला वेळ द्यायला हवा.

Shahid Afridi on Babar Azam
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! PCBने 'या' दोन दिग्गजांना दाखवला घरचा रस्ता

सध्या पीसीबीने फक्त रज्जाक आणि वहाब रियाझ यांनाच काढून टाकले आहे, मात्र येत्या काही दिवसांत ते अनेक मोठे निर्णय घेऊ शकतात. बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनीही दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत, ज्यामध्ये पांढऱ्या चेंडूचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि लाल चेंडूचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी उपस्थित होते. यावेळी संघातील सुधारणांबाबत चर्चा झाली. एवढेच नाही तर पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्याने दोन डझनहून अधिक माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com