

England Test series
esakal
Shardul Thakur says he was underutilised in England Test series: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर(Shardul Thakur) याने मोठा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपल्या क्षमतेचा योग्य वापर झाला नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीर(gautam gambhir) यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती. मात्र, १३ कसोटींमध्ये ३३ विकेट्स घेणाऱ्या शार्दुलला या मालिकेत केवळ दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्या दोन सामन्यांत त्याने फक्त दोन विकेट्स घेतल्या. या दोन्ही सामन्यांत मिळून त्याने २७ षटके टाकली आणि १४४ धावा दिल्या.