Ranji Trophy : रणजी ट्रॉफीमध्ये 'लॉर्ड' शार्दूलचे वादळ! षटकार मारत ठोकले पहिले शतक, अश्विनचे ट्वीट व्हायरल

Ranji Trophy 2024 Mumbai vs Tamil Nadu Semi Final :
Shardul Thakur Ranji Trophy 2024 marathi news
Shardul Thakur Ranji Trophy 2024 marathi news

Shardul Thakur Century Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 चा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई संघ अडचणीत सापडला होता. 106 धावांवर 7 गडी आऊट झाले होते, त्यावेळी लॉर्ड शार्दुल ठाकूरची बॅट जोरदार बोलली. भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने तुफानी शैलीत फलंदाजी करत अवघ्या 89 चेंडूत शतक झळकावले.

Shardul Thakur Ranji Trophy 2024 marathi news
BCCI च्या करारमधून हकालपट्टी झाल्यानंतर पहिल्या सामन्यात Shreyas Iyer फ्लॉप! इतक्या धावा करून झाला आऊट

शार्दुल ठाकूर क्रीझवर आला तेव्हा मुंबई संघ 106 धावांवर 7 विकेट गमावून बसला होता. सामन्यावर तामिळनाडूच्या गोलंदाजाचे पूर्णपणे वर्चस्व दिसले. त्यावेळी मुंबईला मोठ्या भागीदारीची गरज होती. यानंतर शार्दुलने पदभार स्वीकारत आठव्या विकेटसाठी हार्दिक तमारसोबत शतकी भागीदारी केली. शार्दुलने मुंबईची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. हार्दिक 35 धावा करून बाद झाला.

मात्र, हार्दिकच्या बाद झाल्याने शार्दुलच्या फलंदाजीत फारसा फरक पडला नाही आणि त्याने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. शार्दुलने अवघ्या 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या उपांत्य फेरीतील शार्दुलच्या बॅटमधून ही पहिली शतकी खेळी आहे.

शार्दुल ठाकूरच्या शतकी खेळीमुळे मुंबईने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मजबूत स्थिती आली. शार्दुलची फलंदाजी पाहून भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनही हैराण झाला. अश्विनने ठाकूरला 'लॉर्ड बीफी' म्हटले आणि गमतीने त्याला इतके चांगले खेळू नका असे सांगितले.

या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि संघ 146 धावांवर आटोपला. विजय शंकरने सर्वाधिक 44 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 43 धावा करून बाद झाला. मुंबईकडून तुषार देशपांडेने तीन बळी घेतले. शार्दुल ठाकूर, मुशीर खान आणि तनुष कोटियन यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

मुंबईकडून पहिल्या डावात मुशीर खानने 55 धावा केल्या. अजिंक्य रहाणे 15 धावा करून बाद झाला, पृथ्वी शॉ 5 धावा करून बाद झाला आणि श्रेयस अय्यर 3 धावा करून बाद झाला. हार्दिक तामोरेने 35 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com