BCCI च्या करारमधून हकालपट्टी झाल्यानंतर पहिल्या सामन्यात Shreyas Iyer फ्लॉप! इतक्या धावा करून झाला आऊट

Ranji Trophy 2024 Mumbai vs Tamil Nadu Semi Final : अलीकडे अय्यरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक करारातूनही बाहेर केले.
Shreyas Iyer Marathi News
Shreyas Iyer Marathi Newssakal

Ranji Trophy 2024 Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला होता. अलीकडे अय्यरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक करारातूनही बाहेर केले. यासोबत रणजी ट्रॉफीमध्ये न खेळल्याने अय्यर चर्चेत होता. मात्र आता तो मैदानात परतला आहे. पण पुनरागमन सामन्यात तो अवघ्या 3 धावा करून आऊट झाला.

Shreyas Iyer Marathi News
Ranji Trophy : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे निधन

रणजी ट्रॉफी 2023-24 चा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात अय्यर मुंबईसाठी पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. 8 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 धावा केल्या आणि तो बाद झाला. संदीप वारियरने अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Shreyas Iyer Marathi News
IPL 2024 : मोठी बातमी! गुजरात टायटन्सच्या स्टार खेळाडूचा अपघात; सुपर बाइक पडली महागात

याआधीही श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्ध काही विशेष कामगिरी करता आली नव्हती. हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात 35 धावा आणि दुसऱ्या डावात केवळ 13 धावा करून तो बाद झाला होता.

त्याचबरोबर विशाखापट्टणम कसोटीतही तो विशेष काही करू शकला नाही. पहिल्या डावात 27 आणि दुसऱ्या डावात 29 धावा करून तो आऊट झाला. मात्र, याआधी अय्यरने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. अय्यरने 14 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.

Shreyas Iyer Marathi News
Ind vs Eng : शेवटच्या कसोटीत सामन्यात रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय, प्लेइंग-11 मधून 'या' 2 खेळाडूंचा पत्ता कट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com