Mumbai Cricket Association (MCA) celebrated its 2024-25 and 2025-26 seasons with a grand awards ceremony
मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) बुधवारी एका दिमाखदार सोहळ्यात २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन हंगामांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला. भारतीय संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि फलंदाज सिद्धेश लाड यांना 'वर्षातील सर्वोत्तम ज्येष्ठ क्रिकेटपटू' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.