

SHEFALI VERMA CENTURY
esakal
SHEFALI VERMA CENTURY IN INDIA VS BANGLADESH SEMI FINAL: आशियाई क्रीडा २०२६ मधील महिला क्रिकेटचा भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे होत असलेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताने २० षटकांत ४ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या असून बांगलादेशसमोर १९६ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या डावात शफाली वर्माने ४९ चेंडूत नाबाद १०० धावा करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावलं आहे.