Shefali Verma: थायलंडविरुद्ध विजय मिळवूनही टीम इंडियाची चिंता वाढली; शेफाली वर्माने फलंदाजीतील ‘या’ कमकुवत बाजूवर दिला इशारा

Shefali Verma: थायलंडविरुद्ध महिला आशिया करंडक स्पर्धेतील सामना भारताने जिंकला, मात्र मधल्या फळीच्या फलंदाजीवर शेफाली वर्माने चिंता व्यक्त केली. ६४ धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या शेफालीने फलंदाजीत नेमक्या कुठे चुका झाल्या, याचे विश्लेषण करून सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले.
Shefali Verma

Shefali Verma

esakal

Updated on

दुबई : अनुभवात कमी असलेल्या थायलंडसमोर चांगली सुरुवात करूनही भारतीय महिला संघाच्या मधल्या फळीने निराशा केली. महिला आशिया करंडक स्पर्धेत विजय मिळाला असला तरी ही कमकुवत बाजू पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

नेमक्या काय चुका झाल्या, याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे मत सलामीवीर शेफाली वर्माने व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com