
Gujarat beat Saurashtra enter semi-finals : गुजरातच्या पहिल्या डावतील ५११ धावांच्या प्रत्युत्तरात सौराष्ट्रला दोन्ही डावांत मिळून हा टप्पा ओलांडता आला नाही. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत गुजरातने १ डाव व ९८ धावांनी विजय मिळवताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. रणजी करंडक स्पर्धेच्या या पर्वात उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. या विजयानंतर सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेल्डन जॅक्सन याने ( Sheldon Jackson retires) याने निवृत्ती जाहीर केली. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी असलेल्या खेळाडूला राष्ट्रीय संघांत संधी मिळाली नाही.