

Cricket Fraternity Congratulate Shikhar Dhawan
Sakal
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर शिखर धवन नुकताच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. ४० वर्षीय शिखरने त्याची आयरिश गर्लफ्रेंड सोफी शाईन हिच्यासोबत शनिवारी (२१ फेब्रुवारी) लग्नगाठ बांधली.
हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दलची कबुली दिली होती. आता त्यांनी लग्नही केले आहे.