Ranji Trophy : IPL सुरू होण्यापूर्वी CSK चे टेन्शन वाढलं! मुंबईलाही पण बसला मोठा धक्का

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे. पण, या सामन्यापूर्वी एक मोठी बातमीसमोर आली आहे.
Shivam Dube Marathi News
Shivam Dube Marathi Newssakal

Shivam Dube Injured Miss Ranji Trophy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे. रोहित शर्मा आणि कंपनीला हा सामना जिंकून मालिका 3-1 ने जिंकायची आहे. पण, या सामन्यापूर्वी एक मोठी बातमीसमोर आली आहे.

टीम इंडिया आणि मुंबईचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे साइड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे उर्वरित रणजी ट्रॉफी सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. त्याने आसामविरुद्धच्या अंतिम गट सामन्यात पुनरागमन करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण त्याआधी, दुबेला छत्तीसगडविरुद्धच्या मुंबईच्या ग्रुप स्टेज मॅचसाठी विश्रांती देण्यात आली होती.

Shivam Dube Marathi News
Ind Vs Eng : KL राहुलच्या पुनरागमनामुळे कोणत्या खेळाडूचा पत्ता कट? प्लेइंग-11 मध्ये होणार मोठे बदल

आगामी आयपीएल हंगामात शिवम दुबेच्या या दुखापतीमुळे धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचे टेन्शन वाढलं आहे. याचे कारण म्हणजे शिवम दुबे हा त्यांचा प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे, जो चेन्नई सुपर किंग्जला सहावे विजेतेपद जिंकण्यास मदत करेल.

गेल्या काही काळापासून तो सर्व फॉरमॅटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 67.83 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत, तसेच 12 बळीही घेतले आहेत.

Shivam Dube Marathi News
BCCI Action Manoj Tiwary : रणजी ट्रॉफीबाबत भाष्य केल्याप्रकरणी क्रीडा मंत्र्यावर BCCIने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

टाईम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, 'दुबेला साइड स्ट्रेनची दुखापत झाली आहे आणि रणजी ट्रॉफीच्या उर्वरित मोसमातून तो बाहेर जाण्याची शक्यता आहे.” आसामविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली, आणि त्यानंतर बीकेसी येथे आसामच्या दुसऱ्या डावात तो मैदानातही आला नाही. शिवम दुबेच्या जागी संघात मुशीर खान सामील होऊ शकतो.

Shivam Dube Marathi News
विराट अन् रोहितनेही धावा केल्या नाहीत, तरी मलाच बाहेर काढलं? 'या' स्टार खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ उडाली

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच संपलेल्या 2024 अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या मुशीर खानने 2022 मध्ये पदार्पण करत आतापर्यंत तीन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्या तीन सामन्यांत त्याने 19.20 च्या सरासरीने 96 धावा केल्या आहेत. शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून बडोदा विरुद्ध मुंबईच्या आगामी रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी संघ निवडण्यासाठी निवड समितीची बैठक होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com