Shoaib Akhtar questions lack of Pakistan representation in CT 2025
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्स राखून पराभूत करताना भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात यशस्वी संघाचा मान टीम इंडियाने पटकावला आहे, परंतु भारताच्या या यशावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर काही आनंदी दिसला नाही. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) अधिकाऱ्यांचे कान टोचताना मोठं विधान केलं आहे.